01/07/25
Breaking News

परभणीच्या विकासासाठी सदैव कटीबध्द-शिवाजी भरोसे यांची ग्वाही

परभणी,दि 23 ः
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विकास कामे सुरु आहेत. परभणी शहरातील प्रभाग क्रं. ५ मध्ये भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नामुळे लोकमान्य नगर येथील मारोती मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. भारतीय जनसंघाचे जनक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करून विकासकामाचे भूमिपुजन जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले.
याप्रसंगी शिवाजी भरोसे यांनी मनोगत व्यक्त करताना शहरातील मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे, बंदिस्त गटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ती कामे पूर्ण करण्यावर भर देखील दिला आहे. या विकास कामांसाठी मागील अनेक वर्षापासुन जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यावर सदैव भर दिला आहे व तसेच यापुढेही अशीच विकासात्मक कामे करेल, असे शिवाजी भरोसे यांनी आश्वासित केले.
या भुमिपूजन सोहळ्यास भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, अंबादास शिंदे, अशोक ठाकूर, विश्वनाथ गव्हाने, संदीप जोशी, महेश बासटवार, जगन्नाथ घोडके, शंकर आजेगावकर, राजेश शिरडकर, सुनील चपाटे, महेश सावंत, नगरसेवक रितेश जैन, डॉ.मनोज पोरवाल, उमेश शेळके, मनोज मुदिराज, बालाजी सारुक, आनंद देशमुख, गजानन डुब्बेवार, दीपक अग्रवाल, अर्जुन राऊत, अजित वट्टमवारं, बंटी शिंदे, राहुल ठाकूर, राजन झाबंड, गणेश टाक आदी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व महिला उपस्थित होते.

Check Also

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …