परभणी: आणीबाणी ही केवळ लोकशाहीची हत्याचं नव्हती, तर संविधानाच्या मूळ संकल्पनेवर घातलेला घाला होता. हुकूमशाहीचा वरवंटा किती भयानक असतो याची जाणीव भावी पिढ्यांना व्हावी यासाठी हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा अशी अपेक्षा आज परभणी येथे आयोजित ‘संविधान हत्या दिवसा’ निमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.रामरावजी केंद्रे यांनी बोलताना व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आणीबाणीच्या काळ्या दिवसांच्या काळात देशाने अनुभवलेल्या हुकुमशाहीच्या कटु आठवणींची उजळणी करतानाच आणीबाणीच्या काळात देशाच्या लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्या ज्ञात-अज्ञात वीरांना वंदन केले. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आज ‘संविधान हत्या दिन’ पाळला जात आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवात ‘वी द पीपल ऑफ इंडिया’.. अशी आहे, मात्र यातील पीपल म्हणजेच लोकांना दडपण्याचा प्रयत्न आणीबाणीच्या काळात झाला. आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांना नंतर पराभवाला समोरे जावे लागले. यातुलनेत आताचे मोदी सरकार फारच सहिष्णू असून कितीही टोकाची टीका झाली तरीही आकसाने कारवाई करण्यात येत नाही असे यावेळी बोलताना महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी आवर्जून नमूद केले.
भाजपा परभणी महानगरच्या वतीने २५ जुन रोजी आणिबाणीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य सैनानींचा प्रत्यक्ष घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार करताना अभियान संयोजक मधुकर गव्हाणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड एन.डी.देशमुख, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण गायकवाड आदि उपस्थित होते.
