परभणी ,दि 21
मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन दिनांक 28 जून 2025 शनीवार रोजी करण्यात आले आहे. त्यासाठी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांची नाव नोंदणी करून घ्यावी असे अवहान आयोजन समितीच्या वतीने मराठा समाज बांधवांना करण्यात आले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थी चांगले गुण घेऊन परीक्षेत उत्तीर्ण झालेत, भविष्यात यापेक्षाही चांगली प्रगती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. या वर्षी मेघनादिदी बोर्डीकर राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून तर डॉ मनोहर चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड हे प्रमुख पाहुणे तसेच मुख्य मार्गदर्शक म्हणून दिनांक 28 जून 2025 रोजी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती जीवन स्फूर्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या 10वी, 12वी , निट, सिईटी परीक्षेत 90 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तसेच नवोदय व सैनिकी शाळेत निवड झालेले विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांची नोंद पालकांनी करून विद्यार्थ्यांसह कार्यक्रमास उपस्थित राहावे असे अवहान मराठा प्रवाह समन्वय समिती,अखिल भारतीय मराठा महासंघ व शिवमुद्रा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणी संपर्क धाराजी भुसारे 98 23 12 52 27 जिल्हा विशेष लेखापरीक्षण कार्यालय समोर मराठा प्रवाह कार्यालय शिवाजीनगर परभणी या ठिकाणी गुणपत्रक, आधार कार्ड व फोटो प्रत्यक्षात आणून द्यावे किंवा संदीप गव्हाणे 70 20 46 43 05, वैशाली जाधव 75 0 70 54 86 2, एकनाथ मोरे 97 30 99 0 778, सूर्यकांत मोगल 99 75 38 30 57 यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून नोंद करून घ्यावी. असे अवहान विशाल तनपुरे, भास्कर झांबरे ,विजय चट्टे, रमेश भिसे, गजानन देशमुख, गुणवंत सुरवसे यांनी केले आहे.