परभणी,दि 24
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन निर्णय नुसार प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात देऊन भरती करून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार दिनांक 24 जून रोजी कुलगुरू डॉ इंद्रमणी यांची भेट घेऊन केली आहे.
शासन निर्णयानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या आस्थापनावर संबंधित कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून प्रकल्पग्रस्तांचा अनुशेष भाग करून काढण्यासाठी क आणि ड संवर्गातील पदभरतीसाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार ज्यातील तीन कृषी विद्यापीठांनी प्रकल्पग्रस्तांची विशेष भरतीसाठी जाहिराती प्रकाशित केल्या होत्या, त्यांची प्रक्रिया देखील सुरू आहे. परंतु परभणी कृषी विद्यापीठाने अद्याप पर्यंत प्रकल्पग्रस्त भरती जाहिरात प्रकाशित केली नाही, उलट विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांना आंदोलन करताना खोटी आश्वासने देऊन आंदोलने मागे घेण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे एक जुलैपर्यंत प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात प्रसिद्ध करा अन्यथा प्रकल्पग्रस्त 1 जुलैपासून अमरण उपोषण करतील असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. याबाबत कुलगुरू डॉ.इंद्र मणि यांच्यासह कुलसचिव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्त सुनील ज्ञानोबा रनेर,शिवाजी अंकुश रणेर, संपत मुंजाजी रनेर, अन्सिराम कुटे, सोपान शिंदे, नामदेव कुटे, लक्ष्मण शिंदे, रामेश्वर रणेर, मुंजा शिंदे, भीमराव गायकवाड, सुधाकर ढगे, रामकिशन खटिंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.