सेलू/प्रतिनिधी
शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन (२१जून ) उत्साहात साजरा करण्यात आला.
शारीरिक व मानसिक आरोग्याच्या फायद्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या योगाचा जगभरात प्रसार होत आहे. योगसाधना मन व शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.शारीरिक व मानसिक सुदृढता राखण्यासाठी योग उपयुक्त आहेत.
वृषाली देशमुख व गजानन साळवे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायामाचे महत्व सांगितले व प्रात्यक्षिक करून घेतले.हरिभाऊ चौधरी ,उपेंद्र बेल्लूरकर ,करुणा कुलकर्णी ,शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले.
