परभणी : तालुक्यातील साडेगाव येथे भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नांतून १०० केव्ही डीपी बसवण्यास प्रशासनाने मंजुरी देऊन तात्काळ काम पूर्ण केले. त्यामुळे गावकऱ्यांना लाईट संदर्भात होणारी गैरसोय टळणार आहे,e असे भारतीय जनता पार्टीचे शिवाजी भरोसे यांनी सांगितले.
साडेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने १०० के.व्ही. डीपीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती, यासाठी भारतीय जनता पार्टीचे शिवाजी भरोसे यांनी महावितरण विभागाकडे पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत तात्काळ काम पूर्ण करून दिले. याबद्दल यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, सरपंच दिलीपराव देशमुख, प्रसादराव नाईक, शेषेराव भांगे, भीमराव बसुळे, भाजपा मंडळाध्यक्ष्य दैवत लाटे, उत्तमराव देवडे, सुरेशराव बनसावडे, बाळासाहेब नाईक, हेमंत देवडे, केरबा गायकवाड, कपिल कुमार देवडे, अक्षय नाईक, रामा गडगीळे, विशाल देवडे, आदित्य देवडे, सचिन गडगीळे, केशव नाईक, बाबुराव गलांडे, एकनाथ बसुळे, अजय शिंदे, करण नाईक, लक्ष्मीकांत साडेगावकर, विठ्ठल देवडे आदीं सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
