30/06/25
Breaking News

सामाजिक न्याय दिनानिमित्त शेकहॅन्डकडून निराधार भगिनीस शेळी व दोन पिल्लाची मदत

परभणी,दि 26 ः
शेक हॅन्ड मार्फत प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीनिमित्त तथा पुण्यतिथीनिमित्त एका निराधार भगिनीस मदतीचा हात दिला जातो. 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी केली जाते. या जयंतीचे औचित्य साधून शेक हॅन्ड मार्फत भास्कर वाघ यांच्याकडून त्यांच्या घराच्या वास्तुशांतीचा खर्च टाळून विशाखा महादेव समिंदर सोवळे राहणार चाटे पिंपळगाव ता.पाथरी या ताईंना शेळी व दोन पिलांची मदत देण्यात आली.विशाखा यांच्या पतीचे ब्रेन स्ट्रोकने निधन झाले त्यांना प्रज्ञा व अनन्या या दोन मुली असून प्रज्ञा दुसरीत शिकत असून अनन्या अंगणवाडीत शिकते.त्याचप्रमाणे त्यांच्या सासूबाई वृद्ध असल्याने चार जणांचे कुटुंब विशाखा यांना सांभाळावे लागते. त्यांना जमीन देखिल अल्प असल्यामुळे व इतर कुठलीही संपत्ती नसल्यामुळे त्यांच्या एकंदरी परिस्थितीचा विचार करून त्यांना त्यांच्या मागणीनुसार शेळी व दोन पिलाची मदत देण्यात आली.याबाबतचा उद्देश हाच या दोन्ही मुलींचे शिक्षण थांबू नये तथा त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे अशाप्रकारे सामाजिक न्याय दिनानिमित्त गरजूस न्याय देण्याचा एक छोटासा प्रयत्न शेक हॅन्ड व भास्कर वाघ यांच्याकडून करण्यात आला.त्याचप्रमाणे त्यांना व त्यांच्या मुलींना कपडे देण्यात आले.शेक हॅन्ड कडून दुसरीत शिकणाऱ्या मुलीला वर्षभराची शैक्षणिक किट देऊन तीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील भारत सवणे,दत्ता टरपले,सखाराम काळे,दीपक अंबुरे,शंकर धवारे,बाबासाहेब कांबळे,भागवत सवणे यासह शेक हॅन्ड चे रोहिदास कदम,मुंजाभाऊ शिलवने,शरद लोहट आदी उपस्थित होते.

Check Also

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …