सेलू,दि 22 ः
येथील सर्व्हे नंबर १५७, १५८व १६२ मधिल पदमसी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग ला ९९ वर्षांच्या अटी व शर्तीवर दिलेल्या जमीनीची मुळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच आहे त्यामुळे इतर दोन संचलकांनी सदरील जमीन हडपण्याच्या उद्देशाने स्वतःच्या नावे केलेले फेरफार उपविभीय महसुल अधिकारी संगीता सानप यांनी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की येथील गोविंद राम दादुपंथी मठ संस्थान यांनी पदमसी जिनिंग ॲण्ड पेसिंग कंपनीला (सर्व्हे नंबर १५७ , १५८ व १६२ ) नियम अटी व शर्थी च्या अधिनस्थ राहून ९९ वर्षासाठी आपली जामिन दिली होती. मात्र संबंधीत जिनिंग सन २००० साली बंद झाल्यामुळे संबंधीत कंपनी बरोबर केलेला करार संपुष्टात आला होता .परंतु कराराचा कालवधी संपल्या नंतरही पदमसी चे संचालक आनंद जिंदल व पवन गर्ग यांनी दिनांक ७ व २८ ऑगस्ट २०२४रोजी अनुक्रमे फेरफार क्रमांक १५२१५ व १५२३२ अंतर्गत जमीन स्वतःच्या नावे करून घेतली होती.
परंतू उपविभागीय महसूल अधिकारी श्रीमती संगीता सानप यांनी वरील दोन्ही फेरफार रद्द केले असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिल्यामुळे संबंधीत जमीनीची मुळ मालकी गोविंदराम दादुपंथी मठाचीच असल्याचे निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे.
पदमसी जिनिंगचे संचालक आनंद जिंदल व पवन गर्ग यांनी मठ संस्थानची जमीन तहसिलदार सेलू यांच्याकडे आरओआर याचिकेद्वारे फेरफार करून आपल्या नांवे केली होती. सदरील फेरफारीच्या विरोधात मठ संस्थानचे सचिव राजेंद्र करवा व कपील पडूळ यांनी ॲड शिवाजी जाधव व ॲड लहेरचंद खोना यांच्या मार्फत १३ डिसेंबर २०२४रोजी उपविभागीय अधिकारी सेलू यांच्या कडे याचिका दाखल केली होती. सुनावती दरम्यान अपिलार्थीच्या वतीने त्यांनी युक्तीवाद केला की, नियम व अटी प्रमाणे करारनाम्याचा कालावधी संपल्या मुळे संबंधीत करार / लिज संपुष्टात आली असून केलेला फेरफार हा बेकायदेशीर ठरवला आहे . संचालकांच्या वतीने ऍड श्रीकांत वाईकर यांनी बाजू मांडली .
उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ग्राह्य धरून सदरील प्रकरणी तहसीदार यांनी कोणतेही अभिलेखे तपासले नाहीत आणि या न्यायासनास मालकी ठरविण्याचा अधिकार नाही त्यामुळे दोन्ही फेरफार रद्द करण्यात आले असल्याचा व अपिलार्थी व उतरार्थी यांना सक्षम न्यायालयात दाद मागता येईल असा महत्वपूर्ण निकाल १६ जून २०२५ रोजी दिला आहे. त्यामुळे संबंधीत जमिनीची मुळमालकी ही गोविंद रामजी दाइपंथी मठाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Check Also
पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’
परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …