परभणी,दि 24 ः
आणिबाणी काळात तुरुंगवास भोगणाऱ्या तसेच लोकशाही प्रधान देशाच्या इतिहासात आणीबाणीचा इतिहास काळ्या अक्षरातच लिहिला जाईल, भाजपा परभणी महानगरच्या वतीने २५ जुन काळा दिवस म्हणुन व आणिबाणीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य सैनानींचा सत्कार करणार असल्याची माहिती भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी दिली.
यावेळी बोलताना श्री.भरोसे म्हणाले, भारतीय लोकशाहीच्या इतिहासात दि. २५ जून, १९७५ हा काळा दिवस म्हणून लिहिला गेला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या सत्ता बचावासाठी संपूर्ण देशावर आणीबाणी लादली, ज्यावेळी आणीबाणीची घोषणा केली गेली त्यावेळी देश हा आर्थिक संकटातही नव्हता किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवला नव्हता. आणीबाणीच्या काळात तुरुंगात डांबून ठेवण्यात आलेल्यांपैकी अनेक सन्मानित आणि ज्येष्ठ नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले.
आणीबाणीची दोन वर्षे देशासाठी दुर्दैवाची होती. भारतीय संविधान आणि इथल्या कायद्यांमध्ये संशोधन करुन सर्वोच्च न्यायालयाने संशोधन करण्याला स्थगिती दिली होती. पोलिसांच्या दंडूकेशाहीने रौद्ररुप घेतले होते. ही भयाण अवस्था होती. लोकसंख्या वाढीचे कारण देत जबरदस्तीने नसबंदी करणे या प्रकारचे अमानवी अत्याचार सहन करणाऱ्या देशवासीयांना आपला संघर्ष कायम ठेवला. परिणामी सरकारला आणीबाणी मागे घ्यावी लागली.
या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या तसेच लोकशाही प्रधान देशाच्या इतिहासात आणीबाणीचा इतिहास काळ्या अक्षरातच लिहिला जाईल, भाजपा परभणी महानगरच्या वतीने २५ जुन काळा दिवस म्हणुन व आणिबाणीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य सैनानींचा सत्कार करणार असल्याची माहिती शिवाजी भरोसे यांनी बोलताना दिली.