महिलांचे जीवन स्वरमय करणाऱ्या स्वरा ग्रुपची वर्षपूर्ती

0 112

पुणे : महिलांचे आयुष्य चूल आणि मूल या पलीकडे विस्तारलेले असले तर अजून देखील अनेक महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता येत नाही.या गोष्टीचा विचार करून निरंजना चुत्तर यांनी स्वरा महिला ग्रुपची स्थापना केली.

वयाची चाळीसी उलटली की बाई थोडी तिच्या संसारातून मोकळी होते, पण बाकीच्या मैत्रिणी देखील तेव्हा हरवलेल्या असतात. मुलं आणि पती त्यांच्या शिक्षणात आणि व्यवसायात व्यस्त होऊन जातात. अशा वेळी ती पुन्हा नव्याने शोधू लागते तिच्या हरवलेले मैत्रिणी,तिचे हरवलेले छंद. स्वरांच्या माध्यमातून मागील वर्षभरात 110 महिलांनी अनेक गोष्टीचा मनमुराद आनंद घेतला.यावर्षी 150 हून अधिक महिलांनी नवीन वर्षासाठी स्वरांचे सदस्यत्व घेतले आहे.

error: Content is protected !!