04/02/26
Breaking News

केमापूच्या शिक्षकांनी केला अवयवदानाचा संकल्प

सेलू / प्रतिनिधी – हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ता.१३ बुधवार रोजी जि.प.शाळा केमापूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या प्रेरणेने व तालुका आरोग्य अधिकारी कृष्णकुमार चौधरी,उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान पंधरवड्या निमित्त मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर यांनी उपस्थित ग्रामस्थांची अवयवदान विषयक गैरसमज व अवयवदान आजच्या काळाची गरज याविषयी जनजागृती केली. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्था (एन.ओ.टी.टी.ओ.)आणि विविध आरोग्य संस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबवल्या जात असून एक अवयवदाता आठ लोकांचे प्राण वाचू शकतो.त्यामुळे जुन्या चालीरीत्यांना थांबवून माणसाने मृत्यूनंतरही आपल्या अवयवाच्या रूपात गरजू लोकांना अवयव दान करून जीवनदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आवाहनाल शाळेतील सर्व ५ शिक्षक व १२ ग्रामस्थांनी अवयव व उती दान करण्याची नोंदणी करून अवयव दानाचा संकल्प केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण आष्टकर यांनी केले प्रास्ताविक दगडुबा माघाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणिता गाडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभावती घुगे यांनी पुढाकार घेतला.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …