30/06/25
Breaking News

उमरा ते पंढरपूर दिंडीचे विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

श्री सद्गुरू नारायण बाबा पाया दिंडी सोहळा अठरा वर्षाची परंपरा

पाथरी प्रतिनिधी / रमेश बिजुले – पाथरी तालुक्यातील उमरा येथील हनुमान मंदिरापासून पंढरपूरकडे पायी दिंडीचे बुधवार 25 रोजी विठ्ठलनामाच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल एकपाठोपाठ सुंदर अशा चालीवर कीर्तन भजन करीत वारकऱ्यांनी फराळीचे आस्वाद घेतला जयघोषात प्रस्थान झाले. ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे कांसुरकर ह.भ.प.एकनाथ महाराज शिंदे कानसुरकर ह.भ.प. भागवतचार्य तारामतीताई उमरेकर दिंडीचालक ह.भ.प भीमराव कोल्हे उमरेकर व्यवस्थापक बालासाहेब कोल्हे राजाभाऊ कोल्हे यांच्या आशीर्वादाने हनुमान मंदिर वारकरी मंडळाने ही दिंडी आयोजित केली आहे.

 

उमरा येथून निघालेली ही दिंडी श्री क्षेत्र लाटे बाभळगाव, , कळंब ,परतापुर , उपळाई , पावताचा माळा माढा , महेश देशमुख , पंढरपूर मार्गे पंढरपूरला पोहोचेल. गायनाचार्य आणि मृदंगाचार्य टाले यांच्यासह शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. यात अनेक ज्येष्ठ वारकरी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले असून, संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव कोल्हे , माजी पंचायत समिती सभापती अरुणराव कोल्हे शिवसेना उबाठा मुंजाभाऊ कोल्हे तालुकाप्रमुख
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव कोल्हे शिवसेना शिंदे गट वैजनाथराव कोल्हे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Check Also

पंकज क्षीरसागर यांना शासनाचा राज्यस्तरीय ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’

परभणी,दि 27 ः जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे …