परभणी : येथील शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक, कृषी तज्ञ वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रमेश भालेराव उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करत वसंतराव नाईकांनी कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशाला दिशा देण्याचे काम केले असे मत प्रतिपादन करून वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती, दुग्ध विकास क्रांती, रोजगार हमी योजना, पंचायत राज व चार कृषी विद्यापीठांची स्थापना करून कृषी क्षेत्राला संजीवनी प्राप्त करून देण्याचे काम केले, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर जयंतीचे व कृषीदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात प्राचार्य व प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा . डॉ.दत्ता चामले प्रा. डॉ. नितीन बावळे, डॉ. सुनील बल्लाळ, डॉ. काझी कलीमोद्दीन, डॉ. शाम पाठक, डॉ. नवनाथ सिंगापूरे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर यांच्यासह प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अविनाश पांचाळ यांनी प्रास्ताविक डॉ. रमेश भालेराव यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन खडके यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष येडके, राजाराम मूत्रटकर, कु. तनुजा रासवे, राजकुमार नागुला, शेख जावेद, तुकाराम पवार यांनी प्रयत्न केले
