12/07/25
Breaking News

नगर परिषदेच्या प्रवेशदारावर बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू ( प्रतिनिधी )
येथील उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली असुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे .येथे दररोज असंख्य पेशंट व सोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यांची या घाणेरड्या शौचालयामुळे गैरसोय मोठी गैरसोय होत आहे. व परिसरात दुर्गंधी देखील पसरत आहे . आपली तब्येत ठीक करण्यासाठी आलेल्या रुग्णांवर यामुळे आरोग्य खराब करण्याची वेळ आली आहे .तसेच त्यांना उघड्यावर शौचाला बसावे लागत आहे. हे शौचालय साफ करण्यासाठी नगरपरिषद सेलू ला वारंवार सांगूनही यांनी याकडे दुर्लक्ष केले. या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याचा निषेध म्हणून आज नगरपरिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेशरमांची झाडे लावून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावर पण नगरपरिषद ने या शौचालयाची साफसफाई नाही केली. तर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाचा हार घालण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जयसिंग शेळके, लालू खान, चंदू कदम, रफीक खन्ना, मोहन मोरे,मारोती ढोले, रोहित शेळके, ओम खेड़ेकर उपस्थित होते…

Check Also

वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त ठरलां..परभणी मार्गे धावणार

परभणी,दि 09 ः भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने …