पाथरी,दि 03 (प्रतिनिधी)ः
शहरातील शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे बुधवार दिनांक 2 जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अजिंक्य नखाते हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत जपून केला पाहिजे असे आवाहन अजिंक्य नखाते यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय विरकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते सोशल मीडिया हे माहितीचे संप्रेषण असून अत्यंत वेगाने जगातील बाबी सर्वत्र पसरवल्या जात आहेत, युवक या नात्याने अत्यंत सजगतेने याचा वापर केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले.प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ यादव , किशन डहाळे आदी उपस्थित होते. सोशल मीडिया व आजचा युवक या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील माध्यमिक गटातून प्रथम कु. मीनाक्षी योगेश काळे, द्वितीय कु.अनुष्का किशनराव डहाळे, तृतीय कु. शिवानी रामेश्वर तोडकरी यांनी तर उच्च माध्यमिक गटातून प्रथम कु. स्वाती विष्णू कोल्हे द्वितीय कु. प्रतीक्षा मदन गायके तृतीय कु. मानसी हनुमान घाटूळ या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन आसाराम सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद गजमल यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्पर्धक व कार्यकर्ते उपस्थित होते.
