13/07/25
Breaking News

डॉ. अमित कुलकर्णी “Young Scientist Award” ने सन्मानित

सेलू / प्रतिनिधी – नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology) विभागाचे अभ्यासू आणि प्रेरणादायी प्राध्यापक डॉ. अमित डी. कुलकर्णी यांना याना नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठित “Young Scientist Award” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 

डॉ. कुलकर्णी यांनी “Innovations in Biotechnology Research for Sustainable Bioresources and Bioeconomy: Challenges and Practices (IB3-2025)” या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचे शोधनिबंध सादर केला. या परिषदेसाठी संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, कोपरगाव यांनी पुढाकार घेतला होता.

 

या परिषदेमध्ये रशिया, तैवान, फिलिपाइन्स, कंबोडिया आणि भारत यासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा समावेश होता. Microbiologists Society India (MBSI) सह विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहभाग सुनिश्चित केला होता.

डॉ. कुलकर्णी यांच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनातील नावीन्यपूर्णता, शाश्वत विकासाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांची दखल घेत त्यांना “Young Scientist Award” हा आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला.

 

विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलेले कार्य
डॉ. कुलकर्णी हे केवळ शिक्षक नाहीत, तर संशोधनाची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे मार्गदर्शक आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयातूनही जागतिक पातळीवरील दर्जेदार संशोधन होऊ शकते, हे सिद्ध केले आहे.

 

संस्थेचा गौरवसमारंभ
नूतन विद्यालय शिक्षण संस्था, सेलू यांच्या वतीने संस्थेच्या वर्धापन दिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिन या विशेष दिनाचे औचित्य साधून डॉ. कुलकर्णी यांचा ज्येष्ठता प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी त्यांच्या संशोधन प्रवासात कायम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीचाही सन्मान करण्यात आला.

नव्या संशोधकांसाठी प्रेरणास्त्रोत
डॉ. अमित कुलकर्णी यांचे यश हे नव्या पिढीतील संशोधकांसाठी एक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थीमित्रांनी व्यक्त केला. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील ज्ञानसाधनेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता मिळाली आहे.

Check Also

शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली

परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर …