13/07/25
Breaking News

विद्यार्थ्यांनी साने गुरूजींचे संस्कार आत्मसात करावे- प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

सेलू / प्रतिनिधी – कृतज्ञता,सेवा,संवेदनशीलता, कर्तव्य व परोपकार हे साने गुरुजींनी दिलेले संस्कार यशस्वी जीवनाचे मुलाधार आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावे असे प्रतिपादान प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले.

 

येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात कै.किशनराव कान्हेकर व कै.सौ. राधाबाई कान्हेकर यांच्या पुण्यस्मरणा निमित्य आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी मंडळ अधिकारी मुकुंदराव आष्टीकर यांनी शाळेच्या ग्रंथालय व क्रीडा ,विज्ञान साहित्या साठी ₹100000/- रुपये(एक लाख रुपये) देणगी जाहीर केली, तर महेश भांगडीया , सुदर्शन अच्छा, रोहीत आकात यांनी ध्वनी प्रक्षेपक/लाऊड स्पीकर संच व विद्यार्थी वर्ग आसनपट्टया दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रामनाना पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंदराव आष्टीकर, रामराव लाडाने, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, जेष्ठ संचालक जयप्रकाश बिहाणी, मुंजाभाऊ भिसे, सुनील बापू डख, चंद्रशेखर नावाडे, प्रल्हादराव कान्हेकर, एकनाथराव पौळ, केशव डिग्रसकर, हरिहर पाठक, प्रा.नागेश कान्हेकर,राम कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

संस्थचे उपाध्यक्ष श्रीबल्लभ लोया यांच्या तर्फे त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ इयत्ता 10 वी परीक्षेत शाळेतून प्रथम व द्वितीय क्रमांकाने .उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹ 2500/- रुपये तसेच इतर 1 ली ते 9 वी तील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कान्हेकर परिवाराच्या वतीने शालेय साहित्य,सन्मानचिन्ह व प्रशिस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी योगेश सोळंके याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी.शिंदे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, ए.जी.पाईकराव तर एस.एम. जुमडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी.आर.साखरे,आर.व्ही. चव्हाण,भरत रोडगे, विजय हिरे,सौ उषा कामठे, आनंद देवधर, नानासाहेब भदर्गे,विजय अंभुरे, भारती मुळे, फुलारी, साडेगावकर यांनी परिश्रम घेतले.

Check Also

शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली

परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर …