13/07/25
Breaking News

साहित्यिक – कलावंतांना मिळणार मानधन..करा ऑनलाईन अर्ज

परभणी –
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजने अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य सेवेचा गौरव करणे हा आहे.

योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता व अटी :-
अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांगाना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहे.
(दिव्यांगाना वयोमर्यादा ४० वर्ष)
अर्जदाराने साहित्य किंवा कला क्षेत्रात कमीत कमी १५ वर्ष भरीव योगदान दिलेले असावे.
ज्यांनी साहित्य कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे.
वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा / परितक्त्या / दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहिल.
कलाकाराचे सर्व मार्गाने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60000/- रु. पेक्षा जास्त नसावे.
ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार.
केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार.
कलाकार / साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 31 जुलै 2025.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
इच्छुक आणि पात्र साहित्यिक व कलाकारांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahakalasanman.org वर भेट देऊन ऑनलाईनच अर्ज सादर करावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रिंट घेऊन त्या सोबत ऑनलाईन केलेल्या अर्जासोबत अपलोड केलेले कागदापत्रांची सत्यप्रत जोडुन सदरील अर्ज संबंधित पंचायत समितीला जमा करावा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे वयाचा दाखला, आधार कार्ड, मागिल वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, लाभ न घेतल्याचे नोटरी सह प्रतिज्ञा पत्र, बँकचे पासबुक, अपंगत्वाचा दाखला (आवश्यक असेल तर), राज्य/केंद्र सरकारचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था / व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), कला/साहित्य क्षेत्रातील योगदानाचा इतर पुरावे (प्रमाणपत्रे, छायाचित्रे, पेपर कात्रणे इत्यादी) स्पॅन्न करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

योजनेसंदर्भात अधिक माहिती, सविस्तर नियम व अटी तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील साहित्यिक व कलाकारांनी आपले जीवन कला आणि साहित्य क्षेत्रासाठी समर्पित केले आहे आणि ज्यांना सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा.
रघुनाथ गावडे
जिल्हाधिकारी, परभणी.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजने अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून दिनांक 31 जुलै 2025 पूर्वी सर्वांनी अर्ज भरावेत.
डॉ.संदीप घोन्सीकर
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)
जिल्हा परिषद, परभणी

Check Also

शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली

परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर …