13/07/25
Breaking News

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या छात्रसेनेचे यश

परभणी (८)५२-महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडच्या वतीने किनवट येथे आयोजित केलेल्या शिबिरात श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कडेट्सनी ड्रिल,मैदानी स्पर्धा, फायरिंग तसेच सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्ण, रजत तसेच कांस्य अशा २० पदकांची लयलूट करून महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला.
बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांच्या निदर्शनाखाली पार पडलेल्या सदरील शिबिरात ४५० हुन अधिक कॅडेट्सने सहभाग घेतला होता. यात महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या ४६ कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. शिबीरासाठी कॅडेट्सना विभागप्रमुख मेजर डॉ.प्रशांत सराफ यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन विशेष कौतुक केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन नीरज उपलंचवार, कॅप्टन सुजात काजी,सुभेदार मेजर घनश्याम सिंग, सुभेदार राशीद, हवालदार रणजीत सिंग, हरीश कुमार आदींनी सहकार्य केले.

Check Also

शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली

परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर …