महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विविध राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. २०२४ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे. आतापर्यंत या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही. सध्या सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. त्यानुसार यादीतून नावे वगळण्यात येत आहे. त्यामुळे जर तुमच्याही खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
