परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांची नियुक्ती अपर कोषागार अधिकारी, वर्ग-2, राजपत्रित अधिकारी म्हणून जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे झाली आहे. त्यांनी दिनांक ४ जून २०२५ रोजी नव्या पदावर रुजू होऊन कार्यभार स्वीकारला.
श्री. आंबेकर हे जानेवारी २००९ पासून महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी उपकोषागार अधिकारी, हिंगोली; मानवत येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालयात सहायक लेखाधिकारी; तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, परभणी येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
याआधी १९९१ ते २००८ या कालावधीत श्री. आंबेकर हे परभणी येथील न्यायालयीन विभागात देखील कार्यरत होते. त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती, प्रशासनातील अनुभव आणि वित्त विषयातील सखोल जाण यामुळे त्यांच्या नव्या पदावरून अधिक कार्यक्षम सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांच्या आगमनाबाबत सहकाऱ्यांत समाधान व्यक्त होत असून विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.