20/11/26
Breaking News

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया खरंच सुरू झाली का? OTP शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या

2024 मधील विधानसभा निडवणुकीदरम्यान आणि नंतर माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. पण ई-केवायसी प्रक्रियेनंतर अनेक महिला या योजनेतून बाद झाल्या. योजनेत ई-केवायसी पूर्ण झालेल्या 1.65 कोटी महिलांना मदत मिळत आहे. तर 92 लाख महिला कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही अथवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा सर्व पात्र महिलांच्या बँका खात्यात पैसे जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी असे आश्वासन दिले होते. तर गेल्या तीन दिवसांपासून काही महिलांच्या मोबाईलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी मॅसेज येत आहे. काय आहे अपडेट, OTP शेअर करण्यापूर्वी जाणून घ्या

जवळपास 81 लाख महिलांची तांत्रिक अडचण दूर करण्यात येईल अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. केवायसी अभावी आर्थिक लाभापासून वंचित 81 लाख लाडक्या बहि‍णींना पुन्हा योजनेत समावून घेण्यात येणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहि‍णींची केवायसी प्रक्रिया झालेली नाही. अथवा ज्यांची केवायसी प्रक्रिया होऊनही त्यांना सन्माननिधी मिळत नसेल. त्यांना तो लगेच मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिले होते. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी ही हमी दिली होती.

मॅसेजाला बळी पडू नका

दरम्यान राज्यातील काही महिलांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजना ई-केवायसी संदर्भात मॅसेज आल्याचे समोर आले आहे. पण लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in वर याविषयीची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर येत आहे. यामुळे अशा मॅसेजमधील लिंक न उघडण्याचे आणि आधार कार्डशी संबंधित ओटीपी शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांसाठी अजून एक मोठी योजना

राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या धरतीवर महिलांसाठी अजून एक मोठी योजना आणण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील एकल महिलांसाठी सरकार मोठे पाऊल टाकत आहे. एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणण्यात येत आहे. या महिला खमकेपणे एकटाच कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. पतीचे निधन, घटस्फोटीत, परितक्त्या महिलांसाठी ही योजना फायद्याची ठरणार आहे.

Check Also

अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात रोहित पवारांचे गंभीर आरोप..सगळच सांगीतले,कुणामुळे दौरा बदलला

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूला साडे नऊ महिने उलटून गेले तरी …