13/11/26
Breaking News

पुण्यात एनसीपीच्या आमदारांची तातडीची बैठक,नेमक काय घडतंय ?

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी जिजाई बंगल्यावर पक्षातील काही निवडक आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मोजक्याच आमदारांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना पार्थ पवार यांनी तातडीने बोलावलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आली आणि ठराविक आमदारांनाच का निमंत्रित करण्यात आलं, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पार्थ पवार आमदारांची मतं जाणून घेत असल्याचं समजतं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पार्थ पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याने या घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून काही आमदारांना फोन आल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार गटाकडूनही काही आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याचं समजतं. शरद पवार गटातील नेमक्या कोणत्या नेत्यांचे फोन आले होते, याची माहिती पार्थ पवार आमदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

Check Also

परभणी शहरात आता ‘तीन स्वतंत्र तलाठी सजा’

परभणी, ६ — नागरिकांना महसुली सेवा जलद गतीने आणि त्यांच्या स्वतःच्या परिसराजवळ उपलब्ध करून देण्यासाठी …