रमेश बिजुले
पाथरी,दिनांक 14 ः
पाथरी तालुक्यातील उमरा, गौंडगाव, गुंज, कोल्हावाडी रत्नापूर या शिवारात शेतकऱ्यांनी लागवड केलेले टरबूज बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील भोई समाजातील व इतर शेतकऱ्यांनी ही लाईट सीड्स सुरुची या संकरित टरबुज बियाणांची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु बोगस बियाणे असल्यामुळे टरबूज लहान अवस्थेत असतानाच सुकून गेले तसेच कलिंगडाचा रंग देखील आत मध्ये हिरवा निघाला त्यामुळे एकाही व्यापाऱ्याने टरबूज खरेदी केले नाही, शेतकऱ्यांना शेतातच टरबुज खराब होताना पाहावे लागले या प्रकरणी कंपनीच्या एजंट आणि दुकानदाराशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयासह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे त्यांनी निवेदन दिले आहे. यावेळी रमेश बिजुले, दत्ता शालीवान बिजुले, जालिंदर शिवाजी बिजुले, आसाराम बिजुले, संतोष बिजुले, बालासाहेब बिजुले, अर्जुन मारुती, दत्ता धोंडीबा बिजुले, सखा बिजुले, रामप्रसाद बिजुले आदी 35 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Shabdraj www.shabdraj.com