28/02/26
Breaking News

पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात:रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर  याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित केल्या. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.

मात्र ही केवळ दुर्घटना नसून यामागे घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या प्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित केले असून मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आज मुंबईतील वाय बी चव्हाण सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा दावा केला. पायलटच्या मदतीनेच हा घातपात घडवण्यात आला असावा, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केल्यावर काही बाबी संशयास्पद वाटतात. एखादा चेंडू मऊ मातीत पडला तर कमी उसळी घेतो, पण कठीण रस्त्यावर पडला तर जास्त उड्या घेतो, असे उदाहरण देत त्यांनी सांगितले की विमान धावपट्टीवर न पडता बाजूच्या कठीण पृष्ठभागावर आदळले. त्यामुळे त्याचा धक्का अधिक तीव्र झाला. स्फोटाचे मुख्य कारण विमानातील जादा इंधन असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या मते, या विमानातील इंधन टाक्या नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या होत्या. सामान्यतः अशा विमानांमध्ये प्रसाधनगृहाजवळ इंधन टाक्या असतात आणि त्याच्या जवळच उड्डाण नोंद यंत्र असते, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईहून बारामतीकडे जाताना इंधन पूर्ण क्षमतेने भरले गेले होते. मात्र बारामतीला पोहोचल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर तेथेच पूर्ण इंधन भरण्याची गरज काय होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Check Also

‘दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?

 VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे …