शारदा विद्यालयात गणवेश वाटप
सेलू / प्रतिनिधी – सेलू शहर व तालूका पुरोगामी विचारांचा आदर करणारा असून सामान्य, होतकरू, ग्रामीण,शेतकरी, कष्टकरी , कुटुंबातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांचा हात मदतीचा अंतर्गत आतापर्यंत शहरातील विविध शाळेतील 2500 विद्यार्थ्यांना केलेली शैक्षणिक मदत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांनी केले.
येथील कै.सौ. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालय व शारदा प्राथमिक शाळेत शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी आयोजित गणवेश वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री मुंजाभाऊ भिसे, प्रमुख उपस्थिती म्हणून शिवनारायण मालाणी , डॉ.आशिष डख, उल्हासराव नाईकनवरे, सोपान रासवे , संस्थेचे संचालक सुनीलबापू डख, चंद्रशेखर नावाडे, प्रल्हादराव कान्हेकर ,डॉ. विलास मोरे, सुनील गायकवाड ,डॉ. प्रिती मेहता, शुकाचार्य शिंदे, प्रशांत ठाकुर , पि. के.शिंदे , मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, बी. आर. साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुनील गायकवाड यांच्या वतीने शाळेतील ३१ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमान पाईकराव सुत्रसंचलन सुभाष मोहकरे व संदीप जुमडे यांनी केले तर भरत रोडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहीदास चव्हाण, विजय हिरे, सौ. उषा कामठे, विजय अंभुरे, श्रीमती भारती मुळे , साडेगावकर ,फुलारी यांनी परिश्रम घेतले.