परभणी,दि 08 ः
अंगणवाडी कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकास व मदतनीस महासंघाने परभणीच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मंगळवारी जोरदार मोर्चा काढला.

अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्यूटी मिळविण्यास पात्र आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी निर्णय दिला. परंतु, त्या बाबीची राज्य सरकारने अद्यापपर्यंत अंमलबजावनी केली नाही, अशी खंत या मोर्चेकर्यांनी जिल्हा महसूल व जिल्हा परिषद प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. ग्रॅज्यूटीच्या रक्कमेमध्ये एकरकमी सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करुन ग्रॅज्यूटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाच्या या विचाराशी आम्ही सहमत नाही. अंगणवाडी कर्मचार्यांना ग्रॅज्यूटी व एकरकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्रपणे देण्यात यावा, अशी मागणी या मोर्चेकर्यांनी केली. या निवेदनात कर्मचार्यांनी एकूण पाच प्रमुख मागण्यांचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी या मोर्चेकर्यांचे निवेदन स्विकारले.