28/02/26
Breaking News

भागूबाई कुलथे यांच्या दातृत्वाचा सुवर्णकार समाजाकडून सन्मान

सेलू ( नारायण पाटील )
सध्याच्या काळात माणसाची सगळी धावपळ, धडपड तसेच साम ,दाम ,दंड व भेद नीती फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी व स्वतःचे सुख ,आनंद, समाधान व तृप्तता ह्यासाठीच असते .परंतु सोनार समाजाच्या एक दानशूर महिला श्रीमती भागूबाई सखारामजी कुलथे ( मानोलीकर) यांनी सामाजिक बांधिलकी जपत पतीच्या मृत्यू नंतर त्याच्या स्मरणार्थ त्यांच्या नांवे असलेली अडीच एकर जमीन व इतर सर्व संपत्ती त्यांच्या पश्चात सेलू येथील नरहरी महाराज संस्थानला दान करण्याचे इच्छा पत्र तयार करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे .
सेलू येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ७४० व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन येथील हेमंत नगर मधील नरहरी सोनार महाराज मंदिरात करण्यात आले होते .यावेळी ह भ प मधुकर महाराज सायाळकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी नरहरी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक ,विधिवत पूजन व महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले होते .
यावेळी सुवर्णकार समाज बांधव व भगिनीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली .यावेळी समाजातील दानशूर व्यक्तिमत्व जेष्ठ महिला भगिनी श्रीमती भागूबाई सखारामजी कुलथे यांचा समाजाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

Check Also

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार ?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी …