01/02/26
Breaking News

राजकारण

15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. निवडणुकांचे निकाल जाहीर …

Read More »

‘अंडरवेअर’ने घोळ केला, सत्ताधारी आमदार तुरूंगात गेला; खुर्चीही गमावली

केरळचे माजी मंत्री आणि सत्ताधारी डावी आघाडी एलडीएफचे आमदार एंटनी राजू यांना २५ वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. केरळच्या नेडुमंगाजडच्या दंडधिकारी कोर्टाने ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजू यांनी १९९० साली ज्युनिअर वकील म्हणून केस लढवली होती. केस लढताना त्यांनी पुराव्यांशी छेडछाड केली होती. ‘अंडरवेअर ड्रग्स’ प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा मिळाल्याने एंटनी राजू यांची आमदारकी जाणार …

Read More »

बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे झाले पानिपत

राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी आठ वाजता आधी पोस्टल आणि नंतर ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीचा एक तास वगळता राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलांनुसार, बिहारमध्ये भाजप 84, जदयू 78 जागांवर आघाडीवर …

Read More »

मुख्यमंत्री सोडुन संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा..

 ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राशेजारील गुजरातमध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.   गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. नवीन मंत्रिमंडळ स्थापनेची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पटेल गुरुवारी  रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतील आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मंत्र्यांचा …

Read More »

धनुष्यबाण कोणाकडे…निर्णय पुन्हा

जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल, अशी चर्चा कालपासून रंगली होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या  खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता देशाला संबोधित करतील. ते काय बोलतील हे अधिकृतपणे निश्चित झालेले नाही, परंतु नवीन जीएसटी दरांच्या अंमलबजावणीवर ते बोलू शकतात अशी अटकळ आहे. याव्यतिरिक्त, ते आगामी सणांच्या हंगामासाठी स्वदेशी उत्पादनांच्या प्रचारासाठी आवाहन करू शकतात, हा मुद्दा त्यांनी मणिपूर, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भेटींमध्ये मांडला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी १२ मे रोजी रात्री ८ वाजता …

Read More »

आगामी निवडणुका ताकदीने लढविणार : परभणीत शिवसेना व रिपब्लिकन सेनेद्वारे निर्धार

परभणी,दि 21 ः परभणी महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही शहराचा विकास झालेला नाही. काँग्रेसने परभणीच्या विकासाला ओहोटी आणली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन युतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवेल असा विश्‍वास शिवसेना व रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्रात युतीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण …

Read More »

परभणी तालुक्यातील 117 सरपंच पदाची आरक्षण सोडत 14 जुलैला

परभणी दि. 07 ः परभणी तालुक्यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या सोमवारी 14 जुलै रोजी पार पडणार असून, महिलांसाठी 59 पदे राखीव असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवार (दि.14)रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबधित इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले …

Read More »