17/07/26
Breaking News

प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी आयोजन

पूर्णा, (सुशिल दळवी) :
मागील सुमारे ४० वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार विक्रम काळे व आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
येथील सुमन मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता प्राचार्या रजनीताई मोरे यांचा सेवागौरव समारंभ श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ. मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे व आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक दिपक चवणे, माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, नगराध्यक्षा विमलबाई कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, नितीन उर्फ बंटी कदम, संतोष एकलारे, शिक्षणाधिकारी विपुल भागवत, शिक्षणाधिकारी डॉ .सविता बिरगे, सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी पावसे, गटशिक्षणाधिकारी सतिश काष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. प्राचार्या रजनीताई मोरे या अन्नपूर्णा देवी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, आरळ येथून सुमारे ४० वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. श्री.जगदंबा विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव म्हणून ४० वर्षापासून त्या काम करत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याचा गौरव करण्यासाठी सेवा गौरव समारंभाचे आयोजन श्री जगदंबा विद्याप्रसारक मंडळ, संस्थेच्या विविध विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक तथा कर्मचारी यांनी केले आहे.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …