01/02/26
Breaking News

पश्चिम महाराष्ट्र

योद्धा is Back,शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये

पुणे,दि 30 ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. …

Read More »

महाराष्ट्राचे लाडके अजित दादा पवार पंचत्वात विलीन,लाखोंच्या जनसागराचा भावूक निरोप

महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित …

Read More »

‘शासकीय दुखवटा’ जाहीर, या काळात काय असतात नियम?

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आज २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला …

Read More »

बारामती रन वेवर जाऊन शरद पवारांनी घेतली माहिती, मन हेलावणारे दृश्य

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात (Ajit Pawar Baramati Plane Crash) झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. यावेळी  शरद पवारांनी थेट बारामती गाठली आणि हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली.   शरद पवार हे मुंबईत सिल्वर ओक या निवासस्थानी होते. अजित पवार …

Read More »

घड्याळावरुन ओळख पटली, ‘दादांच्या एक्झिट’ची थरारक कहाणी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. बुधवारी सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा आपली सर्व कामे उरकून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाल्याचं दिसून येतंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

विमान क्रॅश होण्यामागे काय कारणे असू शकतात?सुमारे 35 मिनिटे हवेत फिरत राहिले

जेव्हा विमान खाली येत होते, तेव्हा 100 फूट वरूनच वाटू लागले की ते क्रॅश होईल.’ ‘अजित पवारांचे विमान लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 35 मिनिटे हवेत फिरत राहिले होते.’ ‘अजित पवारांचे विमान धावपट्टीजवळ येऊन परत हवेत गेले आणि गिरकी घेऊन परत खाली पडले’ महाराष्ट्रातील बारामती विमानतळाजवळ उपस्थित प्रत्यक्षदर्शी या गोष्टी सांगत आहेत. याच अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 5 जणांसह मृत्यू …

Read More »

महाराष्ट्रासाठी काळा दिवस… पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. अजित पवार पंचायत निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ …

Read More »

पुणे महापालिका निवडणूक: वासंती जाधव यांचा ऐतिहासिक विजय

विजयी महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवून रचला विक्रम पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३१ (मयूर कॉलनी – कोथरुड) मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वासंती नवनाथ जाधव यांनी विजयाचा नवा इतिहास रचला आहे. वासंती जाधव यांनी केवळ प्रतिस्पर्ध्यांचा पराभवच केला नाही, तर पुणे महापालिकेच्या निवडून आलेल्या महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवण्याचा मानही मिळवला आहे. ७२ टक्क्यांहून अधिक मतदारांची पसंती निवडणूक …

Read More »

घड्याळाचे बटण दाबताच कमळाला मतदान?कोठे झाला आरोप

   राष्ट्रवादीच्या घड्याळाचे बटण दाबताच भाजपाच्या कमळाला मतदान होत असल्याच्या आरोपांमुळे पुणे शहरात मोठा गोधळ निर्माण झाला… मार्करची शाई मिटवून अनेक ठिकाणी दुबार मतदान केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला… पुणे महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना एक अजब प्रकार समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर भाजपाच्या कमळाला मतदान होत असल्याचा आरोप एका …

Read More »

अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. डिझाईन बॉक्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अजित पवार यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज ५ वाजता थंडावल्या आहेत. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने पुण्यातील …

Read More »