05/02/26
Breaking News

मराठवाडा

गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे झाले प्रशिक्षणार्थी…

परभणी,दि 19 ः परभणीचे गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे पहिल्याच शिक्षण परिषदेत झाले प्रशिक्षणार्थी आणि त्यांनी दिवसभर तीन केंद्रातील शिक्षण परिषदेला स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. २०२५ -२०२६ या शैक्षणिक क्षेत्रातील पहिली शिक्षण परिषद ता.(१८) शुक्रवार रोजी परभणी तालुक्यामध्ये संपन्न झाली. विशेष म्हणजे परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, आर्वी येथे ते स्वतः ९.५२ वा. उपस्थित होते. त्यांनी दैनंदिन शाळेच्या वेळेला …

Read More »

शिवा संघटनेच्या वतीने मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध,प्रतिमेला मारले जोडे

परभणी,दि 19 ः शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, या विरोधात संघटनेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला …

Read More »

सेलूत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सेलू (प्रतिनिधी ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त सेलूत अभिवादन करण्यात आले . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० तर मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी झाला . ते एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा नूतन विद्यालय परिसरातील पूर्णा कृती पुतळ्यास सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जेष्ठ पत्रकार …

Read More »

कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगासाठी सवलती द्या,शेतमाल खरेदीचा वेग वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील यांनी मांडले प्रश्न

परभणी,दिनांक 18 मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आ.डॉ.राहुल पाटील यांनी   शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रावर सुवीधा,बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ.पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी तळमळीने जिल्ह्यातील शेतीप्रश्न मांडत सरकारचे …

Read More »

महिलांनी मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा बाळगू नये-डॉ. आशा चांडक

परभणी,दि 18 ः ‘महिलांनी मासिक पाळी संदर्भात वैयक्तिक जीवनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बाळगू नये’ असे प्रतिपादन डॉ सौ आशा चांडक यांनी केले. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. सौ आशा पवन चांडक यांचे किशोरवयीन मुली व महिला, माता पालक यांच्यासाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला डासाळा …

Read More »

पूर्णेत मीटरमध्ये छेडछाड;महावितरणने 70 मीटर घेतले ताब्यात

सुशिलकुमार दळवी पुर्णा,दि 17 ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी पूर्णा तालुक्यात वीज चोरी करणाऱ्याची तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या तपासणीत काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे 70 वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. …

Read More »

महिला सामाजिक सुरक्षा जागृती आवश्यक- सौ. संगीताताई तूपसागर

पाथरी,दि 17 ः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. यातून महिलांची मानसिक खच्चीकरण तसेच महिला प्रगतीला बाधा निर्माण होत आहे. महिलांमध्ये जागृती होण्यासाठी त्यांना संरक्षण देणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याची माहिती होणे आवश्यक आहे. महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी महिलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा निरीक्षक सौ. संगीताताई तूपसागर यांनी प्रतिपादन केले. दि.17 …

Read More »

लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची दबाव गटाची मागणी

सेलू(प्रतिनिधी) पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिना झाला परंतू पुरेसा पाऊस परभणी जिल्ह्यात पडलेला नाही.सध्या पिके दमदार पावसाअभावी धोक्यात आली आहेत.त्यामुळे तातडीने लोअर दुधना धरणातून पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी दबाव गटाच्या वतीने आज दि 15 जुलै रोजी जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जायक‌वाडीतून कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने आभार व्यक्त करून त्याच धर्तीवर लोअर दुधना धरणातूनही …

Read More »

पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या …

Read More »

लोकनेते मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पाथरी,दि 17 ःलोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह ओसंडुन वाहत होते. सकाळपासून तालुक्यातून व जिल्ह्यातून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यां शुभेच्छा देण्यासाठी उत्साह दिसून येत होता. ग्रामीण भागातील कार्यकर्ते म्हणत होते. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांना तुम्हीच गरीबाचे कैवारी आहेत अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.पाथरी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा …

Read More »