परभणी,दिनांक 18 मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रावर सुवीधा,बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ.पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी तळमळीने जिल्ह्यातील शेतीप्रश्न मांडत सरकारचे …
Read More »महाराष्ट्र
महिलांनी मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा बाळगू नये-डॉ. आशा चांडक
परभणी,दि 18 ः ‘महिलांनी मासिक पाळी संदर्भात वैयक्तिक जीवनात श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बाळगू नये’ असे प्रतिपादन डॉ सौ आशा चांडक यांनी केले. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाच्या समन्वयक डॉ. सौ आशा पवन चांडक यांचे किशोरवयीन मुली व महिला, माता पालक यांच्यासाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला डासाळा …
Read More »पूर्णेत मीटरमध्ये छेडछाड;महावितरणने 70 मीटर घेतले ताब्यात
सुशिलकुमार दळवी पुर्णा,दि 17 ः महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी पूर्णा तालुक्यात वीज चोरी करणाऱ्याची तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागात देखील कारवाई सुरू करण्यात आली वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या तपासणीत काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे 70 वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. …
Read More »महिला सामाजिक सुरक्षा जागृती आवश्यक- सौ. संगीताताई तूपसागर
पाथरी,दि 17 ः महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. यातून महिलांची मानसिक खच्चीकरण तसेच महिला प्रगतीला बाधा निर्माण होत आहे. महिलांमध्ये जागृती होण्यासाठी त्यांना संरक्षण देणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याची माहिती होणे आवश्यक आहे. महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी महिलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी जिल्हा निरीक्षक सौ. संगीताताई तूपसागर यांनी प्रतिपादन केले. दि.17 …
Read More »लोअर दुधना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची दबाव गटाची मागणी
सेलू(प्रतिनिधी) पावसाळा सुरु होऊन जवळपास दीड महिना झाला परंतू पुरेसा पाऊस परभणी जिल्ह्यात पडलेला नाही.सध्या पिके दमदार पावसाअभावी धोक्यात आली आहेत.त्यामुळे तातडीने लोअर दुधना धरणातून पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी दबाव गटाच्या वतीने आज दि 15 जुलै रोजी जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जायकवाडीतून कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने आभार व्यक्त करून त्याच धर्तीवर लोअर दुधना धरणातूनही …
Read More »पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १७ :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या …
Read More »लोकनेते मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पाथरी,दि 17 ःलोकनेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह ओसंडुन वाहत होते. सकाळपासून तालुक्यातून व जिल्ह्यातून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यां शुभेच्छा देण्यासाठी उत्साह दिसून येत होता. ग्रामीण भागातील कार्यकर्ते म्हणत होते. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी साहेबांना तुम्हीच गरीबाचे कैवारी आहेत अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.पाथरी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा …
Read More »पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी;1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!
देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाचा आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार …
Read More »टरबुजाचे बियाणे निघाले बोगस,शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
रमेश बिजुले पाथरी,दिनांक 14 ः पाथरी तालुक्यातील उमरा, गौंडगाव, गुंज, कोल्हावाडी रत्नापूर या शिवारात शेतकऱ्यांनी लागवड केलेले टरबूज बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील भोई समाजातील व इतर शेतकऱ्यांनी ही लाईट सीड्स सुरुची या संकरित टरबुज बियाणांची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात …
Read More »शिवसेना पक्ष, धनुष्यबाण कुणाचा? ऑगस्ट महिन्यात काय होणार…
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरु असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितले की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्याने अर्ज करणे बंद करा. हे प्रकरण …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com