परभणी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजने अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य सेवेचा गौरव करणे हा आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता व अटी :- अर्जदाराचे वय …
Read More »महाराष्ट्र
गंगाखेड तालुक्यातील तब्बल ४१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द
आमदार डॉ.रत्नाकर गुट्टेंचा ‘लक्षवेधी’ दणका : सहकार विभागाची कडक कारवाई गंगाखेड (प्रतिनिधी) :- स्थानिक राजकारण आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी बोगस व नियमबाह्य पध्दतीने स्थापन करण्यात आलेल्या सर्वविविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी ‘लक्षवेधी’ मागणी स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी २० मार्च २०२५ रोजी मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. …
Read More »महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सुरज शुक्लावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – परभणीत काँग्रेसची मागणी
परभणी – पुणे येथे रविवारी रात्री रेल्वे स्थानकाबाहेर सुरज शुक्ला तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. ही बाब अत्यंत निंदनीय असून या व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा व या घटनेची सीबीआय चौकशी करावी असे निवेदन परभणी जिल्हा काँग्रेस कडून प्रवक्ते सुहास पंडित यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथजी गावडे यांना दिले. या निवेदना मध्ये सांगितले आहे कि, मागील काही …
Read More »विद्यार्थ्यांनी साने गुरूजींचे संस्कार आत्मसात करावे- प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी
सेलू / प्रतिनिधी – कृतज्ञता,सेवा,संवेदनशीलता, कर्तव्य व परोपकार हे साने गुरुजींनी दिलेले संस्कार यशस्वी जीवनाचे मुलाधार आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावे असे प्रतिपादान प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात कै.किशनराव कान्हेकर व कै.सौ. राधाबाई कान्हेकर यांच्या पुण्यस्मरणा निमित्य आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी मंडळ अधिकारी मुकुंदराव आष्टीकर …
Read More »डॉ. अमित कुलकर्णी “Young Scientist Award” ने सन्मानित
सेलू / प्रतिनिधी – नूतन महाविद्यालय, सेलू येथील सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology) विभागाचे अभ्यासू आणि प्रेरणादायी प्राध्यापक डॉ. अमित डी. कुलकर्णी यांना याना नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठित “Young Scientist Award” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. डॉ. कुलकर्णी यांनी “Innovations in Biotechnology Research for Sustainable Bioresources and Bioeconomy: Challenges and Practices (IB3-2025)” या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचे …
Read More »“चकवाचांदण हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे!” — माणिक पुरी
परभणी – “चकवाचांदण हे केवळ आत्मचरित्र नाही, तर अरण्याच्या गूढतेचा, निसर्गाच्या अद्भुततेचा आणि संशोधनाच्या अथक झगड्याचा भाषिक आविष्कार आहे. हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे,” अशा प्रभावी शब्दांत साहित्यिक माणिक पुरी यांनी मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा सखोल परामर्श घेतला. शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी आयोजित ‘… आणि ग्रंथोपजीवीये’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत “एक दिवस : एक पुस्तक” या मालिकेतील पहिले पुष्प …
Read More »पूर्णा शहरात आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी व रिंगण सोहळा संपन्न
पूर्णा / प्रतिनिधी – पूर्णा शहरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त स्वातंत्र्य सैनिक (कै) दाजी साहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा थाटामाटात संपन्न झाला. पूर्णा येथील नवा मोंढा मैदानावरून तालुक्यातील विविध वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ त्याच बरोबर विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अध्यात्मिक देखावे, विविध पथक, पारंपारिक वेशभूषेतील भाविकांसह पालखी व दिंडी …
Read More »संत जनाबाई व संत मोतिराम महाराज समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
गंगाखेड / प्रतिनिधी :- आज आषाढी एकादशी निमित्ताने संत भक्तांमध्ये विशेष उत्साह पहावयास मिळाला. श्री संत जनाबाई यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. पहाटेपासूनच भक्तजन अभिषेक, पूजा व हरिपाठ करत दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होते. पहाटे रेखा गुट्टे यांनी विठ्ठल रखुमाई व संत जनाबाई समाधी चे अभिषेक केला ह्या वेळी डॉ दीनकर मुंडे यांच्या सह संस्था चालक उपस्थित होते. …
Read More »प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करावे – ओमप्रकाश यादव
परभणी – बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्ष दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले. शुक्रवार दि. 04 जुलै 2025 रोजी पाथरी तालुक्यातील वडी या ग्रामपंचायती मध्ये माझं गाव माझं योगदान उपक्रमांतर्गत गावकऱ्यांच्या लोकसहभागातून वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावच्या सरपंच सौ सुशीलाताई खंडागळे, …
Read More »अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाचे यश
परभणी,दि 05 ः राजस्थान येथील चुडेला येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतरविद्यापीठीय बेसबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाने यश मिळवत कांस्य पदक मिळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बेसबॉल संघात महाविद्यालयाच्या पल्लवी पितळे व गायत्री वाघ या खेळाडूंनी सहभाग घेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय बक्षीस मिळवले आहे. सदरील स्पर्धा राजस्थानमधील झुंनझुनवाला विद्यापीठात संपन्न झाली. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com