22/03/26
Breaking News

मुंबई / कोकण

सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार मेहेरबान…थेट तीन टक्यांची वाढ…

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 …

Read More »

पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती निधन झालं, याबाबत पुरावे असताना पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपस्थित केला. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आणि अमोल मिटकरी आक्रमक झाल्याचे दिसून …

Read More »

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार,भाजपाकडून विनोद तावडे ?

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला ‘पत्ता’ खोलला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची …

Read More »

‘दादांचे मित्र आज व्हीएसआरला का वाचवतात?रोहित पवारांचा नेमका रोख कोणाकडे?

 VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान  असू शकते आणि डीजीसीएचे (DGCA) मोठे अधिकारीही यामागे आहेत, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …

Read More »

विमान कंपनी मालकाच्या मुलाचं केंद्रीय मंत्र्याशी कनेक्शन-रोहित पवार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे  कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार  यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप …

Read More »

पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात:रोहित पवारांचा हादरवणारा आरोप

  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर  याने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट (Plane Blast) करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी अजित …

Read More »

अजित पवारांच्या मृत्यूच्या चार दिवसांत 75 संस्थांना अल्पसंख्यांक मान्यता

राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. तरीही ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दुखवट्याच्या …

Read More »

…तर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा

: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जमा होण्याची तारीख देखील समोर आली आहे. महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक लाभ (₹१,५००) मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य झाले आहे. …

Read More »

तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील रिक्त पदांची कोंडी फोडण्यासाठी तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील ५,५०० प्राध्यापक पदांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आचारसंहितेचा अडथळा दूर होताच या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये …

Read More »

शनिवारी 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान….

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस …

Read More »