07/05/26
Breaking News

मुंबई / कोकण

…तर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा

: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जमा होण्याची तारीख देखील समोर आली आहे. महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक लाभ (₹१,५००) मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आता पूर्णपणे अनिवार्य झाले आहे. …

Read More »

तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील रिक्त पदांची कोंडी फोडण्यासाठी तब्बल ७० हजार सरकारी जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रातील ५,५०० प्राध्यापक पदांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आचारसंहितेचा अडथळा दूर होताच या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये …

Read More »

शनिवारी 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान….

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस …

Read More »

सुनेत्रा पवार नव्या उपमुख्यमंत्री,राजभवनात घेतली शपथ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक …

Read More »

हिवाळी अधिवेशन केवळ ८ दिवस…तारीख जाहीर..

मुंबई,दि 03 ः महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन यंदा नेहमीप्रमाणे नागपूरमध्ये होणार आहे मात्र हे अधिवेशन केवळ ८ दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनात अतिवृष्टी ते शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १४ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान हिवाळी अधिवेशन हे …

Read More »

राज्यातील सर्व शाळा ५ डिसेंबरला बंद राहणार

मुंबई,दि 28 ः राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबरला बंद राहणार आहे. राज्यव्यापी शिक्षक संघटनेने संपाचा इशारा दिला असून, विविध मागण्यांबाबत तो आयोजित केला जात आहे. त्यामुळे त्या दिवशी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाहीत, आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. शिक्षक संघटनेची मागणी अशी आहे की, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणे बंद करावे. आणि १५ …

Read More »

पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात अजित पवारांकडून मोठा खुलासा…

मुंबई : पुण्यातील कोंढवा येथील जमीन व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा व्यवहार रद्द होणार असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवार यांनी या व्यवहाराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.   अजित पवार म्हणाले, “माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून ती समिती …

Read More »

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे. …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक इछुक उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार मुंबई – राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

‘कास्ट व्हॅलिडिटी’चा विषय निकाली, सरकारचा मोठा निर्णय, इच्छुकांसाठी गुडन्यूज

महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरींसाठी सार्वत्रिक किंवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. …

Read More »