मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या आंदोलनावरुन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. …
Read More »मुंबई / कोकण
तर एकही मराठा शनिवारी-रविवारी घरी राहणार नाही-मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर तत्काळ सरकारने काढावा. तसेच सातारा आणि हैद्राबाद गॅझेटियर नोंदीचा आधार घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी न्या. संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या समितीकडे केली. या मागण्यांची अंमलबाजवणी पुढच्या दोन चार दिवसांत झाली नाही तर राज्यातील एकही मराठा शनिवारी-रविवारी घरी राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. …
Read More »मराठा आरक्षण आंदोलनात खासदार,आमदारांचा सहभाग,सरकारवर दबाव वाढला..
मुंबई,दि 29 ः मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार यांनी पाठिंबा दिला आहे.या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे.उद्या शनिवारी काही आमदार खासदार सहभागी होणार असल्याची माहीती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. मनोज …
Read More »मराठा आंदोलकांसाठी गुड न्युज..आता शनिवारीही
मुंबई,दि 29 ः मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. ती मुदत आता संपली …
Read More »जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे…मुंबईत भगवं वादळ
मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे …
Read More »शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश निघाला,एक जिल्हा वगळला
सांगली, कोल्हापूरच्या काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारचे शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुकांच्या आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली …
Read More »सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई,दि 20 ः राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वत्र सध्या मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ठकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणानं घेतला आहे. याबाबत एक परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. आता या निवडणुका कधी होणार याबाबत माहिती जाणून घेऊयात. राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »वाहनधारकांना मोठा दिलासा,नविन नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ
ज्या शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. …
Read More »आता अवघ्या काही तासात जमा होणार धनादेश
मोठ्या व्यवहारांसाठी चेक दिला जातो, काहींचे पगारही चेकद्वारे आजही काढले जातात. मग अशावेळी पैसे खात्यावर येण्यासाठी वाट पाहावी लागते. चेक देणारा आणि घेणाऱ्याची बँक एकच असेल तर एक दिवसात चेक क्लिअर होतो. मात्र एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक जाणार असेल तर त्यासाठी एक दोन तीन पैकी कितीही दिवसांचा अवधी लागतो. मात्र आता ही सगळी कटकट संपणार आहे. तुमच्या खात्यावर अवघ्या …
Read More »तब्बल 15 हजार पोलिसांची भरती,परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर
: महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com