23/08/26
Breaking News

आता अवघ्या काही तासात जमा होणार धनादेश

 मोठ्या व्यवहारांसाठी चेक दिला जातो, काहींचे पगारही चेकद्वारे आजही काढले जातात. मग अशावेळी पैसे खात्यावर येण्यासाठी वाट पाहावी लागते. चेक देणारा आणि घेणाऱ्याची बँक एकच असेल तर एक दिवसात चेक क्लिअर होतो. मात्र एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक जाणार असेल तर त्यासाठी एक दोन तीन पैकी कितीही दिवसांचा अवधी लागतो. मात्र आता ही सगळी कटकट संपणार आहे. तुमच्या खात्यावर अवघ्या काही तासांत पैसे जमा होणार.
रिझर्व्ह बँकेने (RBI) चेकद्वारे पेमेंट करणाऱ्या कोट्यवधी बँक ग्राहकांना दिलासा दिला. काही तासांतच चेकचं पेमेंट होणार आहे. RBI ने चेक पेमेंटचे नियम आणि प्रक्रियेत बदल केला आहे. हे नवीन नियम 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. दसऱ्यानंतर आणि दिवाळीपूर्वी, कोट्यवधी बँक ग्राहकांना चेकद्वारे पेमेंट करण्यासाठी आणि पेमेंट घेण्यासाठी तीन दिवसांऐवजी फक्त काही तास लागतील. सोप्या भाषेत सांगायचं तर, चेक बँकेत जमा केल्याच्या दिवशी खात्यात पैसे येतील.

सध्या, चेक क्लिअर होण्यासाठी T+1 म्हणजेच पुढील कामकाजाच्या दिवशी लागतो. जर चेक दुसऱ्या बँकेचा असेल तर त्यालाही तीन दिवस लागतात. आता ही प्रणाली दिवसांऐवजी काही तासांपर्यंत कमी केली जाईल.
चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया बॅचमध्ये केली जाते, ज्यामध्ये क्लिअरिंगला एक ते दोन दिवस लागतात. नवीन सिस्टीममध्ये, चेक स्कॅन केला जाईल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ताबडतोब पाठवला जाईल आणि दिवसभर सतत प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे चेक क्लिअरिंग बँकिंग वेळेत सतत चालू राहील.
CTS म्हणजे काय

CTS ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे, ज्यामध्ये चेकची प्रत बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, चेकचा फोटो आणि तपशील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे देणाऱ्या बँकेला पाठवले जातात. यामुळे प्रक्रिया वेगवान होते आणि फसवणूक होण्याची शक्यता देखील कमी होते. चेकमागे केलेल्या सहीद्वारे देखील फसवणुकीचे प्रकार मागच्या काही काळात वाढले आहेत.
ही सिस्टीम दोन टप्प्यात लागू केली जाईल

RBI ने सांगितले की हा बदल दोन टप्प्यात लागू केला जाईल. पहिला टप्पा 4 ऑक्टोबर ते 2 जानेवारी 2026 पर्यंत चालेल. या काळात, बँकांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व चेकची पडताळणी करावी लागेल. जर बँकेने वेळेवर पडताळणी केली नाही, तर चेक स्वीकारला जाईल आणि सेटलमेंटच्या मोजणीत गृहित धरला जाईल.

दुसरा टप्पा 3 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. यामध्ये नियम अधिक कडक होतील. प्रत्येक चेकची पडताळणी तो मिळाल्यापासून 3 तासांच्या आत करावी लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या बँकेला सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान चेक मिळाला तर त्याला दुपारी 2 वाजेपर्यंत त्याची पडताळणी करावी लागेल. जर या वेळेच्या मर्यादेत पडताळणी केली गेली नाही तर ती स्वीकारली गेली असे मानले जाईल.

Check Also

स्मार्ट मीटर की दुसरं काही? वीजबिल वाढीचं खरं कारण आलं समोर!

Do smart meters cause bills to increase? मुंबई – राज्यात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक …