14/07/26
Breaking News

आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा बहारदार सोहळा

पूर्णा प्रतिनिधी (सुशिलकुमार दळवी):
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरात समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून वाढदिवसाचा सोहळा आगळा-वेगळा साजरा करण्यात आला.दि.१२ ऑगस्ट रोजी गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान, महिलांसाठी साडीवाटप आणि दिव्यांग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन अशा तिन्ही उपक्रमांचा समावेश होता.
सकाळी गुट्टे काका मित्र मंडळाच्या संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘हारतुरे, महागडे गिफ्ट्स किंवा बॅनरबाजी नको; पण रक्तदान शिबिर घ्या’ या आमदारांच्या आवाहनाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो रक्तदात्यांनी यात सहभाग नोंदवला. शिबिराला भेट देऊन आमदार गुट्टे यांनी रक्तदात्यांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांची तब्येत विचारली आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
रक्षाबंधनाचा उत्सव गाठून वाढदिवसाला महिलांचा सन्मान वाढविणारा उपक्रमही राबविण्यात आला. शहरातील कोळीवाडी येथे शेकडो माता-भगिनींना आकर्षक आणि दर्जेदार साड्यांचे वाटप करण्यात आले. महिलांनी साड्यांची गुणवत्ता आणि या उपक्रमामागील आदरभावाचे मनापासून कौतुक केले. महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हा उपक्रम यशस्वी झाल्याचा पुरावा ठरत होता.याच दिवशी पूर्णा येथील मूकबधिर शाळेत अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आ.गुट्टे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुढे जाण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसून येत होती.
महिलांसाठी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आणि रक्तदात्यांसाठी राबविण्यात आलेले हे तिन्ही उपक्रम समाजातील विविध घटकांप्रती असलेली आपुलकी, सन्मान आणि सेवाभाव प्रकट करणारे ठरले. या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्व सहकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि मान्यवरांचे आ.गुट्टे यांनी मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, ता.प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, शहराध्यक्ष राजेश भालेराव,संजय गांधी निराधार सदस्य किशोर सूर्यवंशी , सुशिल ठाकूर, केदार कुरे, जयसिंग चंदन, श्रीनिवास कदम आदींसह गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

हिंगोली जिल्हा परिषदेत ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत विभागप्रमुखांचे प्रशिक्षण संपन्न!

​१६ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाच्या नियोजनावर भर; मुख्य कार्यकारी अधिकारी …