17/07/26
Breaking News

महात्मा फुले समता परिषदेच्या चित्ररथाचे हिंगोलीत जोरदार स्वागत

हिंगोली,दि 05
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्यावतीने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे.या चित्ररथाचे हिंगोलीत सोमवारी आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्यावतीने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे.

या चित्ररथामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. यासोबतच समतेचे महामेरू छत्रपती शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे चित्ररथात साकारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणी करून समाजप्रबोधनाचा संदेश दिला जात आहे.तसेच यामध्ये भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे

. या चित्ररथाचे हिंगोली शहरांमध्ये अग्रसेन चौकामध्ये आगमन होताच फटाक्याची आतिषबादी पुष्प उधळून स्वागत करण्यात आले या रथाची अग्रसेन चौक ते इंदिरा गांधी चौक जुनी नगरपरिषद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी समता परिषद जिल्हा अध्यक्ष चंदू लव्हाळे, समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष वनिताताई गुंजकर, वसंत वाघ, विठ्ठल रावजी पारस्कर, केशवराज जांबुतकर, बालाजीराव सोनवणे, लिंबाजीराव थोरे, आत्माराम सातव, कैलास सातव, सुरेश ढोरे, भागवत बोधने, कैलास भोंडवे, शामराव सर, प्राचार्य गोरे सर, ज्ञानोबा गव्हाणे, गणेश बांगर, वामनराव पवार, लक्ष्मणराव ढोले, संजय सातव, राऊत सर, पोपळघट सर, जयश्रीताई सातव, ज्योती दिघडे, ज्योती धुळे, मीराताई पोपळघट, अनिकेत लव्हाळे निवेश गोरे, गजानन बमरुले, ऋषिकेश लव्हाळे, अंकुश कुटे, धामणे सर, स्वराज वाघ, गोलू, साहिल चौधरी, इत्यादी शेकडो समाज बांधव उपस्थित होते

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …