16/10/26
Breaking News

मराठा आंदोलकांसाठी गुड न्युज..आता शनिवारीही

मुंबई,दि 29 ः
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती.
ती मुदत आता संपली त्यानंतर सगळ्यांच्या नजरा मुंबई पोलिसांकडे लागल्या होत्या. पोलीस आंदोलनाला दिलेल्या परवानगीची मुदत वाढवणार का? पोलिसांनी परवानगी नाकारल्यास जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र  पोलिसांनी आणखी एक दिवस आंदोलनाला परवानगी देत  काही अटीशर्ती घातल्या  आहेत.

मराठा आरक्षणासाठी  मनोज जरांगे पाटील अखेरीस मुंबई दाखल झाले. सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर हजर आहे. मात्र, आझाद मैदानावर एका दिवसाचीच परवानगी दिली आहे. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजेनंतर काय होणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

Check Also

दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’

‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई …