27/03/26
Breaking News

अजितदादांच्या विमान अपघातबद्दल मुख्यमंत्र्यांचा नवा खुलासा

मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी अजूनही काही प्रश्न कायम आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अपघात प्रकरणावर सविस्तर निवेदन दिलं आहे. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या धावपट्टीबद्दल पहिल्यांदाच अहवालात काय नमूद केलं होतं, याची माहिती दिली. ही धावपट्टी पूर्णपणे  अनकंट्रोल एअर फिल्ड असणारी आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
अजित पवार विमान अपघात प्रकरणी कर्नाटकमध्ये एफआयआर करण्यात आला आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवदेन देत, कर्नाटक सरकार आणि पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला.
“केंद्र सरकारने एएआयबीकडून तपासणी सुरू केली आहे, प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यामध्ये अपघाताची माहिती मिळताच एएआयबीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली आणि पाहणी केली. ३ अधिकाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. घटनास्थळी तपासणी केली आहे. बारामती विमानतळावर अधिकृत एमटी मिट्रोनॉजीकल सुविधा उपलब्ध नाही. VFR  उड्डाणासाठी दृश्यमानता ५ हजार मिटरपेक्षा जास्त असण्याची आवश्यकता आहे. घटनेच्या वेळी ३ हजार इतकी दृश्यमानता होती. विमानतळावर विंडशॉक शिवाय दुसरे काहीही नव्हतं. त्यामुळे विमानाचं लँडिंग हे पायलटच्या अनुभवावरच करू शकत होते. विमानतळावर कोणतीही एअरकाफ्ट रेस्क्यू अशी कोणतीही व्यवस्थाही नव्हती. २०१६ नंतर धावपट्टीवर डांबरीकरण झालं नाही, खड्डी आणि चिन्ह फिकी झाल्याचे आढळले होते. बारामतीची धावपट्टी ही अनकंट्रोल एअर फिल्ड असणारी आहे. सारांश सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी सुरू आहे. अंतिम अहवालानंतर सगळ्या बाबी स्पष्ट होतील” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
‘वेळ आली तर कुणाला मुडदा सुद्धा खोदून काढू, पण सहन नाही करणार’

“अजितदादांच्या केसमध्ये तुमच्या मनात शंका ठेवू नका, आकाशपाताळ एक करू, जर कुणाचा हात असेल, कुणाचा बाप असला तरी सोडणार नाही, वेळ आली तर कुणाला मुडदा सुद्धा खोदून काढू, सहन नाही करणार, कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असेल पण भावना बोथट नाही. अजितदादांच्या प्रकरणात कुणी कट रचला असेल तर सोडणार नाही. तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या प्रयत्नाला माझं समर्थन आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, काही जणांमध्ये नाही ते दाखत नसतील. पण मी पुन्हा एकदा सांगतो, सगळी चौकशी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत काहीही चुकीचं होऊ देणार नाही’ असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

Check Also

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद

राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण …