पाथरी (प्रतिनिधी) : पंचायत समिती पाथरीच्या सभागृहात तालुकास्तरीय समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्री.एस.एन.हांदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विस्तार अधिकारी संदीपान घुंबरे हे होते.प्रमुख उपस्थिती सांख्यिकी विस्तार अधिकारी सुमित वाघमारे,पेशकार श्रीमती परदेशी,ग्राम महसूल अधिकारी संदीप बडगुजर,सय्यद साजेद,राहुल सानप,गजानन घांडगे,कृषी विभागाचे श्री.उगले,महा ई-सेवा आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक तुकाराम पौळ,रवी मांगुळकर,भागवत उगले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात अग्रीस्टक नोंदणी, आधार अद्ययावत सेवा ,उत्पन्न, जातीचे दाखले, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखले,घरकुल लाभार्थी ,अपंग अनुदान,जिवंत सातबारा,गोपीनाथ मुंडे अपघात विमा लाभार्थी,शालेय दाखले यांसह विविध प्रकारची प्रमाणपत्रे तात्काळ वितरीत करण्यात आली. याशिवाय नागरिकांनी शेतकरी अनुदान, जलसंधारण योजना, निवडणूक ओळखपत्रे अशा विविध बाबींवरील अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.यावेळी आधार केंद्र चालक तुकाराम पौळ यांनी १४ वर्ष वयाचे अपंग मुलगा समर्थ संभाजी नखाते या लाभार्थी आधार कार्ड साठी खूप प्रयत्न करत होते पण ते आधार कार्ड तयार होत नव्हते.तुकाराम पौळ यांनी विशेष प्रयत्न करून 100% अपंग समर्थ संभाजी नखाते याचे आधार कार्ड तयार करून दिले.पालकांनी याचे समाधान व्यक्त केले व या कमी जिल्हाधिकारी कार्यालयातील कपिल पेंडलवार,अतुल निहाते,नरेंद्र अडगावकर यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप बडगुजर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. तुकाराम पौळ यांनी मानले.