सुशिल दळवी)
पूर्णा ,ता 29 ः
वाढत्या बेरोजगारीच्या आव्हानात्मक परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्याकरिता आणि सर्वांनाच नोकऱ्या आजच्या काळात मिळणे अशक्य असल्याकारणाने उद्योग विश्वात विद्यार्थी पाय रोवून उद्योगशील कसा होईल ? याकरिता उद्योगशील संस्कार आणि वयवसाय निवडीचे स्वातंत्र्य याबाबत जाणीव जागृती करून उदयोगशील विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हास्तरीय सुलभक मारोती कदम यांनी केले .
ते व्यवसाय शिक्षण व उद्योजकता तालुकास्तरीय प्रशिक्षणत अभिनव विद्या विहार पूर्णा येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट ) परभणी व गट साधन केंद्र पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय व्यवसाय शिक्षण व उद्योजकता प्रशिक्षणातमाध्यमिक शिक्षकांना मार्गदर्शन करताना समारोपीय कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले .दि 27 मार्च ते 28 मार्च 2026 या दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते . याप्रसंगी पूर्णा तालुक्यातील छपन्न माध्यमिक शिक्षकांनी सदर प्रशिक्षणात सहभाग नोंदवला . गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक म्हणून अनिल ढाले यांनी तर डॉ.अमोल देशपांडे यांनी सुलभक म्हणून यशस्विरित्या जबाबदारी पार पाडली . शाळा स्तरावर व्यवसाय मर्गदर्शन केंद्राची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या उद्योगशील नेतृत्वाला व्यवसायिकतेची जोड देण्याकरिता माध्यमिक शिक्षकांनी व्यवसाय आणि उद्योजकतेचे धडे गिरवले .
Shabdraj www.shabdraj.com