गंगाखेड / प्रतिनिधी :- आज आषाढी एकादशी निमित्ताने संत भक्तांमध्ये विशेष उत्साह पहावयास मिळाला. श्री संत जनाबाई यांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. पहाटेपासूनच भक्तजन अभिषेक, पूजा व हरिपाठ करत दर्शनासाठी रांगेत उभे राहिले होते. पहाटे रेखा गुट्टे यांनी विठ्ठल रखुमाई व संत जनाबाई समाधी चे अभिषेक केला ह्या वेळी डॉ दीनकर मुंडे यांच्या सह संस्था चालक उपस्थित होते.
भक्तिगीते, टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. महिलांनी नित्यनेमाने ओव्या म्हणत जनाई माईचे गुणगान केले. मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने सुरळीत दर्शन व्यवस्था ठेवण्यासाठी विशेष तयारी केली होती.
संत जनाबाई यांच्या जीवनातील “नाम घ्या रे भावांनो, नाम घ्या” या शिकवणीचा प्रभाव भक्तांच्या वर्तनातून जाणवत होता. ग्रामीण भागासह शहरातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले.
पंढरपूरच्या वारीसोबतच स्थानिक मंदिरांनाही भक्तांच्या गर्दीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ह्या भक्तीमय वातावरणात जनतेने सामाजिक एकता, अहिंसा व नामस्मरण याचे स्मरण करत आपली परंपरा जपली आहे.
—आषाडी एकादशी निमित्त संत मोतीराम महाराज समाधी मंदिर येथे श्री गिरधारीलाल काकाणी यांनी पहाटे सपत्नीक अभिषेक केला फळा येथे पालम व गंगाखेड,ताडकळस भागातील भक्तांनी दर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.