श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा

0 94

रामभाऊ आवारे
निफाड,दि 13 ः
शिवशंभू स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य,निफाड तालुका आयोजीत स्वराज्य संस्थापक श्री शिवरायांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजीत करण्यात येत असुन निबंध स्पर्धेची मर्यादा-१२ जाने. ते १२ फेब्रवारीपर्यंत अशी ठेवली असुन या स्पर्धा चार वयोगटात घेण्यात येणार आहे अशी माहिती मराठा महासंग्राम संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा टाकळी विंचुर ग्रामपंचायत सदस्य केशवराव यशवंत जाधव यांनी दिली आहे.

 गट-१(इयत्ता पाचवी ते सातवी)
विषय-१)शिवरायांचे असामान्य बालपण.२)संत गाडगेबाबा-स्वच्छतेचे पुजारी.३)कोरोनानंतरचा शाळेचा पहिला दिवस .शब्दमर्यादा-५०० शब्द,
 गट-२(इयत्ता आठवी ते दहावी)
विषय-१)शिवरायांच्या आयुष्यातील प्रेरणादायक प्रसंग
२)मी कोरोना बोलतोय ३)पाणी वाचवा-जीवन वाचवा
४)छत्रपती शिवराय-एकमेवाद्वितीय व्यक्तीमत्व.शब्दमर्यादा-७००शब्द

 गट-३(इयत्ता अकरावी,बारावी,पदविका)
विषय-१)शिवरायांचा राज्याभिषेक-स्वराज्याचा सुवर्णक्षण २)कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण व त्याचे परिणाम.३)पृथ्वीचे वाढते तापमान-एक जागतीक संकट ४)कोरोना व पर्यावरण-शिकवण व अपेक्षा शब्दमर्यादा-१०००शब्द

 गट-४(पदवी व पदव्युत्तर) विषय-१)माझे आदर्श-शिवाजी महाराज २)कोरोना विषाणू-उगम,लक्षणे,परिणाम व उपचार. ३)मोबाईल शाप की वरदान ४)महिला सक्षमीकरण-वास्तव व व्यथा.शब्दमर्यादा-१५००शब्द

पारितोषिके- प्रत्येक गटासाठी प्रथम पारितोषिक-₹१०००/- व प्रमाणपत्र ,द्वितीय पारितोषिक-,₹७००/- व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक-,₹ ५००/- व प्रमाणपत्र  नियम व अटी-
आपला निबंध कोणत्याही एक विषयावर पुरेसा समास सोडून फुलस्केप कागदावर हाताने लिहून पाठवावा.टाईप करू नये, निबंधासोबत सर्वांनी आपापल्या शाळा वा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडावे.बोनाफाईड प्रमाणपत्र नसल्यास निबंध ग्राह्य धरला जाणार नाही, निबंधासोबत निबंध लेखनाचे अक्षर हे लेखकाचे स्वत:चेच असल्याबाबत घोषणापत्र जोडावे.घोषणापत्र नसल्यास निबंध ग्राह्य धरला जाणार नाही, निबंध दि.१२-२-२०२२ या तारखेपर्यंत रजिष्टर किंवा स्पीड पोस्टने पाठवावेत.त्यानंतर आलेले निबंध स्विकारले जाणार नाहीत.,निबंध पाठवितांना पाकीटावर व निबंधाच्या कव्हरींग लेटरवर गट क्र.स्पष्टपणे नमूद करावा, निबंध लेखक हा नाशिक जिल्ह्यातील कायम अथवा तात्पुरता रहिवासी असावा.संपर्काचा पत्ता नाशिक जिल्ह्यातील असावा.

निबंध पाठविण्याचा पत्ता-केदार सुरेश शिंदे
शिवशंभू स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य
निफाड तालुका अध्यक्ष, एस. के.मोबाईल अँड गिफ्ट हाऊसटाकळी,लासलगाव,ता.निफाड,जि.नाशिक-422306, अधिक माहितीसाठी संपर्क-केदार सुरेश शिंदे
9890606399,अभिजीत महाले7666959066,
विशाल पठारे 9529892676,

पारितोषिकांचे प्रायोजक-
प्रथम पारितोषिक- केशवराव यशवंत जाधव मराठा महासंग्राम संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळी यांचेमार्फत, द्वितीय पारितोषिक -शिवा सुरासे मा.सभापती, निफाड
तृतीय पारितोषिक सरपंच व उपसरपंच,ग्रामपंचायत,टाकळी अश्विनी ताई जाधव सरपंच,ज्ञानेश्वर पाटील मोकाटे,उपसरपंच.

error: Content is protected !!