परभणी – पुणे येथे रविवारी रात्री रेल्वे स्थानकाबाहेर सुरज शुक्ला तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. ही बाब अत्यंत निंदनीय असून या व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा व या घटनेची सीबीआय चौकशी करावी असे निवेदन परभणी जिल्हा काँग्रेस कडून प्रवक्ते सुहास पंडित यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री रघुनाथजी गावडे यांना दिले.
या निवेदना मध्ये सांगितले आहे कि, मागील काही दिवसापासून महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्था ही राहिलेली नाहीये. परभणी व पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर य यांच्या पुतळ्याची विटंबना असो की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपशब्द बोलून गरळ ओकणारे काही प्रवृत्ती वाढल्या आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा किंवा सरकारचा कोणताही धाक राहिला नाही त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. आमचा सवाल आहे की विटंबना करणारा नेहमी माते फिरू किंवा पागलच कसा निघतो व त्यांना तात्काळ माथेफेरू पागल हे सर्टिफिकेट 24 तासाचा आत कोण देतं. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुणे येथील घटने मध्ये आरोपी सुरज शुक्ला यांनी भगवी वेशभूषा परिधान करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी चढून शस्त्राचा वापर करून त्याचं शिर कापण्याचा प्रयत्न केला.
गांधीजी हे देशाचे राष्ट्रपिता व प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे देशाचा अपमान आहे. या सर्व घटनेचा परभणी काँग्रेस कमिटी निषेध करते व या आरोपीवर तात्काळ देशद्रोहचा गुन्हा दाखल करून यामागील कुणाचा हात आहे व कुणाचे षडयंत्र आहे या बाबींची सीबीआयकडून सखोल चौकशी व्हावी असे निवेदन देण्यात आले.निवेदन देताना प्रवक्ते सुहास पंडित दिगंबर जी खरवडे सेवादल अध्यक्ष शजी अहमद खान, वैजनाथ देवकते, राजेश रेंगे,सुभाष जी पांचाळ आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.