कृषि विद्यापीठाला निधी द्या,रिक्त जागा भरा,आमदार डॉ.राहुल पाटील दुसऱ्या दिवशीही आक्रमक

0 43

परभणी,दि 29 ः
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 50 कोटी रुपयांचा निधी देऊन रिक्त जागा भराव्यात व तंत्रज्ञानावर संशोधनासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत अधिवेशन दरम्यान केली त्याला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सकारात्मक उत्तर देत चारही कृषि विद्यापीठांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली,तसेच तिन महिण्यात रिक्त जागा भरण्याचे अश्वासन दिले.अशी माहिती आमदार राहुल पाटील यांनी दिली.

हिवाळी अधिवेशन दरम्यान गुरुवारी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अनुदानासह रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला आमदार डॉ. पाटील म्हणाले की, कृषी विद्यापीठाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहे, याबद्दल आम्ही पन्नास कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती, मात्र अद्यापही शासनाने ही मागणी पूर्ण केली नाही. केवळ निधी देतो असे सांगितले ,त्यावर तात्काळ 50 कोटी रुपये द्यावेत तसेच कृषी विद्यापीठांमध्ये 50 टक्के होऊन अधिक रिक्त जागा आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरावीत. सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे, आगामी काळात सर्व शेती ही तंत्रज्ञानावरच होणार असल्याने ड्रोन तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी संशोधन व्हावे म्हणून भरी निधी द्यावा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात कृषी हा विषय अनिवार्य करावा, राज्यातील चारही विद्यापीठांच्या संशोधनासाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी आमदार डॉ.पाटील यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी चांगलेच आक्रमक होत शासनावर जोरदार टिका केली.शासन समृध्दी महामार्गावर बाबींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते, परंतु कृषी विद्यापीठांच्या बाबतीत  मात्र हात आखडता घेत आहे,असा घनाघात केला.

यावर उत्तर देताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, परभणीच्या कृषी विद्यापीठाला पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यातील 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.तसेच राज्यातील चारही कृषि विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली.तसेच रिक्त जागांबाबत 80 टक्के जागा भरण्याची घोषणा केली आहे.किती तंतोतंत जागा किती रिक्त आहेत याची माहीती घेऊन येत्या तीन महिण्यात भरती प्रक्रिया सुरु केली जाईल अशी माहीती श्री.सत्तार यांनी दिली.
तसेच कृषि अभ्यासक्रमाच्या बाबतील शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करुन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासमोर विषय मांडुन त्यांची परवानगी घेऊन निश्चीत निर्णय घेऊ असे अश्वासन सत्तार यांनी दिले.
आमदार डॉ.पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कृषि विद्यापीठांचे भाग्य उजळणार असुन भरीव निधीच्या तरतुदीमुळे संशोधनाला चालना मिळुन शेतकऱ्यांना लाभ होणार हे निश्चीत झाले आहे.

error: Content is protected !!