सेलू दि २१
सेलू परभणी रोडवर जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज दि २१ रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आज सकाळी ११ ते ११.३० दरम्यान दुचाकी (MH ०९ BN ८४३३) आणि हायवा ट्रक (MH २२ AN ९७५५) यांच्यात वालूर जोड रस्त्यावर अपघात झाला. हायवा ट्रकने दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रखमाजी नामदेव थोरात (वय ५५, रा. डुघरा) हे दुचाकीसह ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले अन् अपघात झाला. हायवा ट्रकने दुचाकीला मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार रखमाजी नामदेव थोरात (वय ५५, रा. डुघरा) हे दुचाकीसह ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले बबन कचरू सिरसाट (वय 49, रा. कुपटा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस उपनिरीक्षक शाकेर शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किर्तेश्वर तेलंगे, पोलीस हवालदार उस्मान शेख, पोलीस हवालदार सुरेश पुलाते आणि पोलीस नाईक कांगणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्ती व मृतदेह राहुल कांबळे यांच्या ईश्वरी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, सेलू येथे हलवण्यात आला.
अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील कारवाई पोलीस ठाण्यात सुरू होती.
राखमाजी थोरात यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर डुघरा गावात शोककळा पसरली आहे.
सध्या सेलू-परभणी,सेलू दिग्रस(जहांगीर) या रस्त्यासह तालुक्यात अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत.काहींच्या प्लॉटिंग मध्ये मुरूम टाकण्याचे कामे सुरू आहेत.ही सर्व कामे मोठमोठ्या हायवामधून सुरू आहेत.परंतु या हायवांची गती जास्त असते,प्रशिक्षित चालक आहेत का? या सर्व बाबी प्रशासनाने पाहणे आवश्यक आहे.अनेकवेळा हे हायवा मोठ्या वेगाने धावत असून यांच्या बेदरकार गतीला आवर घालणार कोण? अशी चर्चा सुरू आहे.
Shabdraj www.shabdraj.com