27/03/26
Breaking News

शेतरस्ता अडवला तर आधार कार्ड ब्लॉक, सरकारी योजनाही बंद

राज्यातील शेतकरी आणि त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते असावेच लागतात, ती काळाची गरज आहे. पण ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्या सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. आता जर कुणी शेतरस्ता अडवला तर सरकारी योजनेचा लाभ बंद होणार आहे. त्याशिवाय फार्मर आयडी आणि आधार कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. राज्य सरकारकडून यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे.

शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाई

गाव नकाशावर असलेल्या किंवा सरकारी जागेतील रस्त्यांवर कोणी अतिक्रमण केले असेल, तर तहसीलदार त्यांना ७ दिवसांत अतिक्रमण काढण्याची नोटीस देतील. नोटीसनंतरही जर संबंधित व्यक्तीने स्वतःहून अतिक्रमण काढले नाही, तर तहसीलदार स्वतः ते अतिक्रमण काढून टाकेल. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, जे लोक रस्त्याचे नुकसान करतील किंवा रस्ता अडवतील, त्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी (Farmer ID) ५ वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल. त्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ किंवा कोणतीही शासकीय मदत मिळण्यास ५ वर्षांसाठी अपात्र ठरतील.

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’नेसाठी कोणतेही सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही. जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील, त्यांना नोंदणीकृत दानपत्र (Gift Deed) किंवा हक्कसोड पत्र करून देणे अनिवार्य आहे. हे दानपत्र शासनाच्या नावे होत असल्याने, त्यावर लागणारे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि नोंदणी फी पूर्णपणे माफ असेल. या जमिनीची नोंद संबंधित शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर घेतली जाईल आणि एकदा दिलेली जमीन शेतकऱ्याला पुन्हा परत मागता येणार नाही.

Check Also

स्टोव्ह काढा बाहेर…… शिधापत्रिका धारकांना मिळणार 3 लिटर केरोसीन

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सामना देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून गॅसटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. …